Tuesday, July 02, 2024 09:29:30 AM

जिल्ह्याचे नाव धाराशिव तर मतदारसंघाचे नाव उस्मानाबाद

जिल्ह्याचे नाव धाराशिव तर मतदारसंघाचे नाव उस्मानाबाद

उस्मानाबाद, १७ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात निवडणूक  होणार असून १९ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. तर ७ मेला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील २० लाख ४ हजार २८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्र असून यात लातूरच्या औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर आणि परंडा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणुकीची तयारी झाली असून प्रत्येक  विषयाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. २ हजार १३९ मतदान केंद्र असणार आहेत. तरुण मतदारांची संख्या ४ लाख ३६ हजार ४४ आहे. तर यात नव्याने मतदान करणाऱ्यांची संख्या ८० ते ८५ हजार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बसे यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री