Thursday, July 04, 2024 10:12:30 AM

अंबाबाई मूर्तीबाबतचा अहवाल २५ तारखेला सादर होणार

अंबाबाई मूर्तीबाबतचा अहवाल २५ तारखेला सादर होणार

कोल्हापूर, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी :  करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची सलग दुसऱ्या दिवशी तज्ञांनी पाहणी करण्यात आली. मूर्तीबाबतचा सविस्तर अहवाल २५ तारखेला न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे. याविषयावरील पुढील सुनावणी ४ एप्रिलला होणार असून त्यात या अहवालावर चर्चा होईल. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची मोठी झीज झाली असून मूर्तीवरील संवर्धनाचा लेप गळून पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन आदेशाने गेल्या दोन दिवसांपूर्वी पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगिराज यांनी मूर्तीची पाहणी केली.


सम्बन्धित सामग्री