जळगाव, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात अर्थात १ एप्रिल २०२३ पासून तीन लाख रुपये पीक कर्ज घेतले आहे. त्या शेतकऱ्यांना व्याज माफ करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना १२ कोटी रुपयांचे कर्ज गेल्या वर्षी वाटप करण्यात आले आहे. त्यावरील व्याजाची रक्कम ७२ कोटी रुपये इतकी आहे. व्याजमाफीचा निर्णय घेणारी जळगाव जिल्हा बँक राज्यात पहिली असल्याचे चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.