Friday, July 05, 2024 03:56:39 AM

देहूच्या इंद्रायणी नदीत मृत माश्यांचा खच

देहूच्या इंद्रायणी नदीत मृत माश्यांचा खच

पुणे, दि. १६ मार्च, २०२४, प्रतिनिधी : देहूच्या इंद्रायणी नदीत पुन्हा एकदा मृत रोहू माश्यांचा खच आढळून आलाय. देहू गावातील कापूर ओढ्यातून प्रदूषित पाणी इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याने या माश्यांचा मृत्यू झाल्याचं पर्यावरण प्रेमींनी म्हटलंय.

इंद्रायणी नदीच्या पात्रात प्रदूषित पाणी सोडल्याने पाण्याची ऑक्सीजनची पातळी खालावली आणि वेळेत ऑक्सीजन न मिळाल्याने या माश्यांचा मृत्यू झालाय. वारंवार देहू आणि आळंदी येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करून देखील कोणतीच कारवाई होत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय.


सम्बन्धित सामग्री