Sunday, July 07, 2024 12:22:21 AM

निवडणूक काळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ९८ पथक

निवडणूक काळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ९८ पथक

सोलापूर, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारीपासून लागू होणार असल्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नेमलेली ४६ भरारी पथके व जिल्ह्याच्या सीमेवर नेमलेली ५२ पथके शनिवारपासूनच जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू करतील. मतदान केंद्रे, संवदेनशील केंद्रे निश्चित झाली असून, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नांदणी, मरवडे, वाघदरी येथे सीमा तपासणी नाके तयार केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक मद्यविक्री दुकानांमध्ये किती विक्री झाली, याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच जिल्ह्याअंतर्गत व जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाणार असून ढाबे-हॉटेल्सवर छापेमारी होणार आहे. अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सहा पथके व एक विशेष पथक नेमले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.


सम्बन्धित सामग्री