Sunday, July 07, 2024 09:03:44 PM

एमपीएससीच्या मुख्य परीक्षाही मराठी भाषेतून घ्याव्यात, औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका

एमपीएससीच्या मुख्य परीक्षाही मराठी भाषेतून घ्याव्यात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ मार्च, २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी पूर्व परीक्षा मराठी भाषेत घेतली जाते. मात्र मुख्य परीक्षा इंग्रजीत होते. नुकताच महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेसंदर्भात महत्वाचे धोरण ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एमपीएससीच्या कृषी विभागासह सर्वच मुख्य परीक्षा मराठीतून घेण्यात याव्यात, अशी विनंती करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्या. रवींद्र घुगे व न्या. आर. एम. जोशी यांनी राज्याचे प्रधान सचिव व एमपीएससीला नोटीस बजावली आहे.


सम्बन्धित सामग्री