Sunday, July 07, 2024 12:22:11 AM

निराधारांना ११ महिन्यांपासून शासनाची मदत नाही

निराधारांना ११ महिन्यांपासून शासनाची मदत नाही

सोलापूर, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील चार हजार ४३० निराधार मुलांना ११ महिन्यांपासून शासनाकडून एक रुपयाची देखील मदत मिळाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामध्ये ७४ अनाथ बालकांचाही समावेश आहे. ऑनलाइन पद्धतीने थेट लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा करण्याचा प्रयोग केला जात असल्याने विलंब लागत असल्याचे अधिकारी मागील काही महिन्यांपासून सांगत आहेत. पण, ११ महिन्यांपासून त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळालेला नाही.

बालसंगोपन योजनेतील लाभार्थींना यापूर्वी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातून दरमहा मदत दिली जात होती. पण, आता वरिष्ठ कार्यालयातूनच थेट लाभार्थींच्या खात्यात दरमहा मदतीची रक्कम जमा होणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू असल्याने काही महिन्यांची मदत लाभार्थींना मिळालेली नाही. पण, काही दिवसांत मागील सर्व मदत लाभार्थींना मिळेल अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी दिली आहे.  

              

सम्बन्धित सामग्री