Sunday, July 07, 2024 12:20:36 AM

‘जीआयएस’ प्रणालीद्वारे ‘सात-बारा’ जोडले जाणार

‘जीआयएस’ प्रणालीद्वारे ‘सात-बारा’ जोडले जाणार

पुणे, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : एखाद्या गावातील भौगोलिक ठिकाणानुसार गट नंबर, ‘सर्व्हे नंबर’वरील जमिनीचे अक्षांश-रेखांशाच्या आधारे जमीन कोठे आहे हे सांगणे शक्य झाले आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून संबंधित जमीन मालकाच्या सातबाऱ्याला त्या जागेचा नकाशा ‘जीआयएस’प्रणालीद्वारे जोडणे आणि त्यासोबत गावांच्या नकाशांचे भूसंदर्भीकरण (जिओ रेफरन्सिंग) करण्याचा राज्यातील ७७२ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा भूमी अभिलेख विभागाचा मानस आहे.


सम्बन्धित सामग्री