Tuesday, July 02, 2024 10:50:11 PM

महसूल सहाय्यकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

महसूल सहाय्यकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

नवी मुंबई, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : तहसील कार्यालयातील एका महसूल सहाय्यकाने शेती संदर्भातील काम करण्यासाठी काही तरी द्यावे लागेल असं सांगत १ लाख ३० हजारांची मागणी केली होती. मात्र शेतकऱ्याने ही तक्रार नवी मुंबई लाच लुचपत विभागाला केल्यानंतर त्यांनी पाहणी केल्यानंतर महसूल सहाय्यकाने मला फक्त ४० हजार द्या अशी मागणी केली. त्यानुसार लाच लुचपत विभागाने पैसे देताना महसूल सहाय्यकाला रंगेहात अटक केली आहे. भोगवटादार वर्ग दोनची जमीन भोगवटा वर्ग एक मध्ये करण्यासाठी लाच मागणाऱ्या पनवेल तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यकाला ४० हजारांची लाच घेताना नवी मुंबई लाच लुचपत विभागाने अटक केली आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर नवी मुंबई लाचलुचपत विभागाने लाच देताना पनवेल तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यकाला अटक केली आहे. या प्रकरणामुळे पनवेल तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.


सम्बन्धित सामग्री