पुणे, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील कोंढवा भागातील धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता. अशी माहिती एनआयएच्या तपासात समोर आले आहे. पुण्यातील कोंढवा भागात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे कोंढवा परिसरात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेत काही ठिकाणी नियंत्रित स्फोटही घडवून आणण्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली.
पुण्यातील कोंढव्यातच बॉम्ब तयार करण्याचे संशयित दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले. मागच्या वर्षी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. याच दोन दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटात बदल केल्याची माहिती चौकशीत उघड झाली. एनआयएकडून याप्रकरणी आणखी चार दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पूर्व आणि आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.