Tuesday, July 02, 2024 08:53:36 AM

पाणीटंचाईने चक्क प्रसूती ढकलली पुढे

पाणीटंचाईने चक्क प्रसूती ढकलली पुढे

प्रतिनिधी, संभाजीनगर, दि. १५ मार्च २०२४ : छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे चक्क सिझर पुढे ढकलावे लागत आहे, अशी धक्कादायक बाब समोर आली. यामुळे बाळ आणि आई दोघांच्याही जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे नेहमी पाहायला मिळते. परंतु, आता चक्क घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागालाही अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा फटका बसत असल्याचा प्रकार समोर आला. घाटीतील प्रसूती विभाग हा सामान्य प्रसूतीवर भर देत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होतात. काही वेळा बाळ आणि आईच्या सुरक्षिततेसाठी सिझेरियन करावे लागते. मागील वर्षभरात घाटीमध्ये १९ हजारांपेक्षा जास्त प्रसूती झाल्या आहेत. यात सिझेरियन करण्याचे प्रमाण २२ टक्के होते. म्हणजेच दिवसभरात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी २२ टक्के रुग्णांत सिझेरियन करावे लागते. मागील दोन दिवसांपासून पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने सिझेरियन करताना अडचणी येत आहेत. यामुळे सिझेरियन पुढे ढकलण्याची वेळ येत आहे.


सम्बन्धित सामग्री