Sunday, July 07, 2024 08:51:16 PM

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क मिळणार परत

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क मिळणार परत

प्रतिनिधी, संभाजीनगर, दि. १५ मार्च २०२४ : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षेच शुल्क परत मिळणार असून हे शुल्क संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व मुख्याध्यापकांकडून पात्र विद्यार्थ्यांच्या याद्यांसह बँक खात्याची देखील माहिती मागवली आहे. सध्या दहावी च्या परिक्षा अंतिम टप्प्यात असून त्याचवेळी परीक्षा मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क परत करण्याबाबत एक पत्र काढले असून यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस पडलेला नाही त्यामुळे सरकारने नोव्हेंबर महिन्यात १५ जिल्ह्यातील ४० तालुके आणि १०२१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता यासोबतच संबंधित भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीची सवलतही लागू करण्यात आली होती. दरम्यान विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाल्यावर त्यांच्या खात्यावर परीक्षा शुल्काच्या प्रतिकृतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

                    

सम्बन्धित सामग्री