Wednesday, October 02, 2024 10:41:54 AM

राज्यातील १ हजार महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र

राज्यातील १ हजार महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र

प्रतिनिधी, मुंबई, दि. १३ मार्च २०२४ : राज्यातील १ हजार महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र सुरु करणार असल्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. बुधवारी पहिल्या टप्प्यात १०० कौशल्य विकास केंद्र सुरु करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात होणार आहे. राज्यात किमान २० हजार युवक व युवतींना प्रशिक्षण मिळणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांची नोंदणी, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सुसंगत अभ्यासक्रम निवडणे, महास्वयंम पोर्टलवर माहिती भरणे यासह सर्व माहिती या प्रशिक्षणामध्ये दिली जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते रोजगार मिळेपर्यंत कौशल्य विकास विभागाने एक आदर्श कार्यपद्धती तयार केली आहे.


सम्बन्धित सामग्री