Monday, July 01, 2024 12:59:09 AM

खाजगी ट्रॅव्हल्सवर गोळीबार, चारजण जखमी

खाजगी ट्रॅव्हल्सवर गोळीबार चारजण जखमी

प्रतिनिधी, अमरावती, दि. १३ मार्च २०२४ : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर धक्कादायक घटना घडली आहे. रात्री अकरा वाजताच्या सुमारास धावत्या ट्रॅव्हल्सवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळविहीर ते शिवणगावजवळ ही घटना घडली. या गोळीबारात चारजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.


सम्बन्धित सामग्री