Friday, July 05, 2024 03:56:16 AM

जायकवाडीपासून ३९ किमीची नवीन जलवाहिनी

जायकवाडीपासून ३९ किमीची नवीन जलवाहिनी

छत्रपती संभाजीनगर, १२ मार्च २०२४, प्रतिनिधी : जायकवाडी ते नक्षत्रवाडी या दरम्यान ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली आहे. या जलवाहिनीच्या माध्यमातून आठवडाभरात २५ एमएलडी पाणी वाढेल. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी याची मदत होईल, अशी माहिती मिळाली आहे.

उन्हाळ्यात शहरात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये आणि शहराला वाढीव पाणी मिळावे यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान सुमारे ३९ किलोमीटरची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. नऊशे मिलीमीटर व्यासाच्या या जलवाहिनीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी प्राधिकरणाने तीन कंत्राटदार नियुक्त केले.

या कंत्राटदारांनी दिलेल्या वेळेपूर्वी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण केले. या जलवाहिनीची चाचणी घेण्याचे काम वीस ते २५ दिवसांपासून सुरू होते. हे काम आता पूर्ण झाले आहे. उन्हाळ्यात शहरात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान सुमारे ३९ किलोमीटरची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे.या जलवाहिनीच्या चाचणीचे काम अवघ्या २५ दिवसात पूर्ण करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री