Friday, July 05, 2024 03:03:10 AM

महिलांना स्वयंरोजगारासाठी यंत्रसामग्रीचे वाटप

महिलांना स्वयंरोजगारासाठी यंत्रसामग्रीचे वाटप

मुंबई, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिकेच्या वतीने महिलांसाठी यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. त्यामुळे महिलांना बळ देण्याचे काम ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ठाण्यात महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी स्वयंरोजगार योजना राबविण्यात आली.

महिलांसाठी शिलाई मशीन आणि घरघंटी देत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. ठाण्यातील जवळपास ११ हजार महिलांना योजनेचा लाभ झाला असून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. महिला दिनानिमित्त केंद्र सरकारकडून सिलेंडरचा दर कमी झाला असून अशातच दुग्ध शर्करा योग म्हणून महिलांना बळ देण्यासाठी स्वयंरोजगार यंत्रसामग्रीचे वाटप ठाण्यात करण्यात आले. या सर्व संधी आणि यंत्रसामग्री दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार येत्या काळात अशा अनेक योजना मुख्यमंत्र्यांनी राबवाव्यात अशी इच्छा देखील माजी नगरसेविका जयश्री फाटक यांनी व्यक्त केली आहे.


सम्बन्धित सामग्री