Wednesday, July 03, 2024 03:01:27 AM

मराठवाड्यात पाण्याचे संकट; टँकरने पाणीपुरवठा

मराठवाड्यात पाण्याचे संकट टँकरने पाणीपुरवठा

मराठवाडा, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात आतापासूनच उन्हाळ्याचे संकट जाणवू लागले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात पाणी टंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २७९ टँकरने छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जिल्ह्यात ५२० विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन संभाजीनगरमध्ये १२६ गावे आणि २९ वाड्यांना १८९ टँकरने पाणीपुवठा केला जात आहे.

जालना जिल्ह्यातील ७० गावे आणि २६ वाड्यांना १२९ टँकरने पाणीपुवठा करण्यात येत आहे. मराठवाड्यात आतापासूनच लोकांना पाण्याचे संकट पडले आहे. उन्हाळा अजून सुरू झाला नाही तोपर्यंत पाण्याची कमतरता भासू लागली आहे. यंदा संपूर्ण महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्याने पाण्याचा साठा कमी आहे. त्यात मराठवाड्यासारख्या दृष्काळग्रस्त भागातील नागरिकांना आतापासूच उन्हाळ्याचा पर्यायाने पाण्याचा सामना करावा लागत आहे. यावर प्रशासनाकडूनही वेळोवेळी पाऊले उचलली जात आहेत.  


सम्बन्धित सामग्री