Sunday, July 07, 2024 12:53:59 AM

मराठवाड्यात फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

मराठवाड्यात फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

मराठवाडा, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील मोसंबी,  द्राक्ष,  डाळिंब,  पेरू,  सीताफळ,  अंजीर आदी फळपिकांच्या बागा मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत. यंदाच्या पावसाळ्यात एक दोन अपवाद वगळता प्रत्येकच जिल्ह्यात पावसाचे प्रदीर्घ खंड व अपेक्षेच्या कसोटीवर पाऊस नापास झाल्याचेच चित्र आहे. त्यामुळे उत्पादन सोडा, अनेक वर्षांपासून जगलेल्या बागा वाचविण्याचे संकट फळबागधारक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.


सम्बन्धित सामग्री