Friday, September 20, 2024 02:33:55 AM

वीज मंडळाच्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला यश

वीज मंडळाच्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला यश

नागपूर, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : नागपूर येथे महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगारांचे गेले चार दिवस आंदोलन चालू होते. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलनाच्या पाचव्या दिवशी महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांचे प्रतिनिधींची बैठक झाली. कंत्राटी कामगारांच्या १७ मागण्या मान्य करत तिन्ही विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा करण्यात येईल आणि यावर योगय तो निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे बैठकीत राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील वीज कंत्राटी कामगारांना दिलासा देण्यास आला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मुलभूत प्रश्न निश्चितपणे सोडवले गेले पाहिजेत. त्यांच्या आर्थिक मागण्यांवर चर्चा झाली. कंत्राटदार त्यांचे शोषण करतात. नियमित आणि त्यांना जेवढे वेतन देय आहे. ते त्यांना मिळत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या थेट खात्यात पैसे देण्यासाठी प्रयत्न करू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर काही कंत्राटदारांच्या खात्यात वेतन गेल्यानंतर पैसे काढून घेतात अशा प्रकरणांच्या चौकशीचे आदेश देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कंत्राटी कामगारांबद्दल शासन संवेदनशील असून त्यांचे इन्शुरन्स आणि मेडिक्लेमचे विषय टप्प्या-टप्प्याने मार्गी लावू. हिंसा, मारामारी आणि अडवणूक प्रकार सहन केले जाणार नाहीत. त्यांनी ज्या काही मागण्या केल्या आहेत. त्या न्यायपूर्ण पद्धतीने मांडल्या पाहिजेत. त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. असेही उपमुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.   


सम्बन्धित सामग्री