Monday, July 01, 2024 02:55:48 AM

‘असा हडपला कारखाना’

‘असा हडपला कारखाना’

बारामती, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी :आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. ईडीकडून कन्नड साखर कारखान्याची एकूण १६१ एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. तसेच साखर कारखान्याच्या संबंधित प्लांट, मशिनरी आणि बिल्डिंग स्ट्रक्वर्स हे ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. बारामती अ‍ॅग्रो प्रा. लि. कंपनीनं हा कारखाना ५० कोटी रुपयांना खरेदी केला होता. पण बारामती अ‍ॅग्रोनं कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेले पैसे प्रत्यक्षात खेळत्या भांडवलाची गरज भागवण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बँकांकडून घेतले होते. मात्र, ते त्यासाठी न वापरता कारखाना खरेदी करण्यासाठी वापरले. बँकेकडून मिळालेल्या पैेसे वळवण्याचा हा प्रकार दिसतो, असा ठपका ईडीनं ठेवला होता. या प्रकरणात रोहित पवार यांची दोनदा चौकशी केली होती. तसंच, बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर ईडीनं छापेही टाकले होते व मनी लाँन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं कन्नड सहकारी कारखान्याची जमीन, प्लाण्ट, यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=Q8GASdZEYWY

कन्नड सहकारी साखर कारखान्याची उभारणी शेतकऱ्यांनी केली.
छत्रपती संभाजी नगर इथे गरजवंत शेतकऱ्यांनी समभाग उचलून सहकारी साखर कारखाना उभारला.
कन्नड सहकारी साखर कारखान्याने राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेकडून त्यासाठी २०१२ साली कर्ज घेतलं.
कालांतराने कारखाना आर्थिक डबघाईला आल्याचे दाखवले गेले.
कारखाना विकण्यासाठी लिलाव पुकारण्यात आला.
बारामती ऍग्रोने साखर कारखाना खरेदी करण्यासाठी हायटेक इंजिनीअरिंगला पुढे केले
हायटेक इंजिनीअरिंगला २५ ऑगस्ट २०२२ रोजी ५ कोटी रुपये मिळाले.
बारामती ऍग्रोचा आर्थिक व्यवहार तपासात उघड
बारामती ऍग्रोने खेळते भांडवल म्हणून घेतलेले पैसे कारखाने बळकवायला वापरले.
लिलावात हायटेक इंजिनीअरिंगने बारामती ऍग्रो प्रा. लि. कंपनीसाठी ५० कोटी रुपयांना कारखाना खरेदी केला.
शेतकऱ्यांचे कारखाने हडपण्याचे षड्यंत्र उघड - ईडी


सम्बन्धित सामग्री