Sunday, July 07, 2024 08:50:29 PM

ठाण्यात सर्वात मोठा नमो रोजगार मेळावा

ठाण्यात सर्वात मोठा नमो रोजगार मेळावा

ठाणे, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : ठाणे येथे नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील हा पाचवा रोजगार मेळावा आहे. आतापर्यंतचा सर्वांत मोठा रोजगार मेळावा आहे. ५२ हजारांपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झाले आहे. ७०० पेक्षा अधिक कंपनी या मेळाव्यात उपस्थित झालेल्या आहेत. देशात याआधी झाला नाही अश्या रोजगार मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील हा दोन दिवसीय महारोजगार मेळावा आहे.

प्रत्येक गरजू तरूणांना रोजगार मिळत नाही किंवा स्वरोजगार मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. कंपन्यांना हवं त्याप्रमाणे सुधारणा करू तसेच तरूणांना प्रशिक्षण देऊ असं सरकारचे धोरण आहे अशी प्रतिक्रिया कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माध्यमांना दिली आहे. हा देशातील सर्वात मोठा महारोजगार मेळावा आहे. सर्वात पहिला रोजगार मेळावा नागपूर येथे झाला. त्यांनतर लातूर, बारामती, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.


सम्बन्धित सामग्री