पुणे, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुणे शहरातील पोलिसांनी गेल्या तीन वर्षातील ड्रग्ज पेडलरांना शोधले असून ते ड्रग्ज पेडलर आता पोलिसांच्या रडारवर आहेत. मागील ३ वर्षात ग्राहकांना किरकोळ स्वरूपात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या तब्बल ५० महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुणे पोलिसांनी त्या महिलांवर कारवाई केली आहे. या महिलांच्या माध्यमातून ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी ३० परदेशी नागरिकांना अटक केली आहे. या ड्रग्ज पेडलरांवर पोलिस नजर ठेवून आहेत. या पेडलरांना ड्रग्जचा पुरवठा कुठून केला जातो याबद्दलच्या माहितीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या पेडलरांची साखळी उद्धवस्त करण्याचे काम गुन्हे शाखेने हाती घेतले आहे.