Monday, July 01, 2024 04:11:51 AM

उमरगा शहराच्या पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटली

उमरगा शहराच्या पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटली

प्रतिनिधी, धाराशिव, दि. ४ मार्च २०२४ : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहराच्या पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटली. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरासाठी नव्याने करण्यात आलेली पाईपलाईन महामार्गांच्या तीन ठिकाणी फुटली आहे. तर गेल्या चार दिवसांपासून पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.


सम्बन्धित सामग्री