Friday, July 12, 2024 05:47:31 PM

'भराडी देवी, कष्टकरी, शेतकऱ्यांना सुखी आणि संपन्न कर'

भराडी देवी कष्टकरी शेतकऱ्यांना सुखी आणि संपन्न कर

सिंधुदुर्ग, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी यात्रेला अनेक ठिकाणांहून भाविक येतात. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कष्टकरी आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होऊ दे, त्यांच्या जीवनात समृध्दी येऊ दे, त्यांना सुखी आणि संपन्‍न कर असे साकडे मुख्यमंत्र्यांनी आई भराडी देवी चरणी घातले.

आंगणेवाडी येथील यात्रोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे आदी उपस्थित होते. यावेळी श्री भराडी देवी यात्रोत्सव समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


सम्बन्धित सामग्री