Saturday, April 19, 2025 04:17:58 PM

मराठवाड्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

मराठवाड्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

जालना, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्यात सोमवारी सायंकाळी ठिकठिकाणी वादळीवाऱ्यासह गारपीटीच्या पावसाने हजेरी लावली. जालन्यातील भोकरदन तालुक्यात जबरदस्त गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पीकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच, कुंभारी आणि सिपोरा बाजार येथे अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


सम्बन्धित सामग्री