Saturday, April 12, 2025 05:29:45 PM

बाजारात कैरीची आवक वाढली

बाजारात कैरीची आवक वाढली

प्रतिनिधी, नागपूर, दि. २५ फेब्रुवारी २०२४ : उन्हाळा म्हंटलं की सुट्ट्या आल्या. आणि उन्हाळ्यात सर्वात जवळची असणारी गोष्ट म्हणजे आंबा. त्यामुळे उन्हाळ्याची चाहुल लागली असून बाजारात कैरीची आवक जोरात सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत स्थानिक आवकदेखील सुरू होणार असून त्यानंतर दरात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या बाजारात कैरीचा दर प्रतिकिलो ६० ते ७० रुपये आहे. आंबटगोड कैरी आणि उन्हाळा हमखास ठरलेले समीकरण आहे. उन्हाळ्यात कैरीचे पन्हे, कैरीचे तात्पुरते लोणचे, कैरीचा तक्कू, गोडआंबा आदी पदार्थ बनविण्यात येतात. याशिवाय, कैरीचे काप करून तिखटमीठ लावून खाण्याचीदेखील वेगळीच मजा आहे. अशी ही कैरी सध्या दक्षिणेतून येत आहे. ठोक बाजारात दररोज २५० ते ३०० पोती कैरीची आवक होत आहे. प्रत्येक पोत्यात साधारणपणे ६० ते १०० किलो कैरी असते. सध्या कर्नाटक, तामिळनाडू येथून नागपुरात कैरी येत आहे. गेल्या महिनाभरापासून आवक होत आहे. मात्र, अद्याप स्थानिक आवक सुरू झालेली नाही.

                 

सम्बन्धित सामग्री