Wednesday, October 02, 2024 12:49:29 PM

पालघरच्या वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध

पालघरच्या वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध

वाढवण, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. वाढवण बंदर संघर्ष समितीने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे. प्रकल्प रद्द करण्याची मागणी होत आहे. ही मागणी करण्यात प्रामुख्याने स्थानिक मच्छीमार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. आंदोलनावेळी कायदा - सुव्यवस्था बिघडू नये यासाठी डहाणूतील चारोटी येथे पोलिसांचा बंदोबस्त आहे. स्थानिकांनी पालघर बंद पुकारला आहे.

महाराष्ट्रात असलेली दोन मोठी आणि देशासाठी महत्त्वाची असलेली बंदरे

१. मुंबई बंदर
२. जवाहरलाल नेहरू बंदर

प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे महत्त्व

प्रस्तावित वाढवण बंदरात सव्वा चार सागरी मैल अंतरावर अर्थात आठ किमी वर समुद्र वीस मीटर खोल आहे. यामुळे वाढवण बंदरात मोठ्या आधुनिक मालवाहक जहाजांना थांबवणे व्यावहारिकदृष्ट्या सोयीचे आहे. वाढवण बंदर राष्ट्रीय रेल्वे मार्गाच्या जाळ्यापासून दहा किमी वर आहे. तसेच आठ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गापासून पस्तीस किमी वर तर मुंबई - वडोदरा महामार्गापासून अठरा किमी वर आहे. जवाहरलाल नेहरू बंदर आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड संयुक्तपणे वाढवण बंदर प्रकल्पात सहभागी होणार आहेत. या बंदरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. मोठ्या जहाजांना हाताळणाऱ्या जगातील सर्वोत्तम अशा दहा बंदरांपैकी सात बंदरे एकट्या चीनमध्ये आहेत. वाढवण बंदरामुळे सर्वोत्तम दहा बंदरांच्या यादीत भारताचा प्रवेश होईल. प्रस्तावित वाढवण बंदरात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशचा पश्चिमेकडील भाग, उत्तर भारतातील राज्ये यांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होणार आहे.


सम्बन्धित सामग्री