Thursday, July 04, 2024 09:05:44 AM

बैलगाडा विश्वातील 'गोल्डमॅन' हरपला

बैलगाडा विश्वातील गोल्डमॅन हरपला

प्रतिनिधी, पनवेल, दि. २१ फेब्रुवारी २०२४ : बैल आणि बैलगाडा शर्यत हा तसा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. आणि याच बैलगाडा शर्यतींच्या क्षेत्रातील 'गोल्डमॅन' म्हणून ओळखले जाणारे पंढरीशेठ फडके यांचं निधन झालं आहे.

पंढरीशेठ यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकूल वातावरण आहे. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यतप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. पनवेलचे असलेले पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यत शौकिन म्हणून ओळखले जातात. १९८६ सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या निराळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा 'बैल'मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती.


सम्बन्धित सामग्री