Thursday, December 12, 2024 07:01:10 PM

मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर

मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर

मुंबई , १९ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : सोमवारी (दि. १९ फेब्रुवारी ) मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी पहाटे दाट धुके पसरल्याचे जिल्ह्यात दिसून आले. थंडी आणि धुके एकत्र पडल्याने मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना सुखद अनुभव घेता आला. मात्र, दाट धुके पडल्यामुळे वाहनचालकांनी लाईटस लावून वाहने चालविली. सध्या कोकणात बऱ्यापैकी थंडी पडली असून धुके पडल्याने पुढील काही दिवसात थंडी कमी होण्याची शक्यता आहे. या धुक्याचा परिणाम आंबा व काजू पिकावर होऊन किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

महत्त्वाचे मुद्दे -

  • मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर
  • धुक्यामुळे वाहनचालकांना त्रास
  • सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागांवर किडीचा प्रादुर्भाव

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo