Sunday, July 07, 2024 09:41:46 PM

माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन

माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन

पुणे, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. वल्लभ बेनके यांचा जन्म २३ जून १९५० रोजी हिवरे बुद्रूक या छोट्याशा गावात झाला. ते व्यवसायाने शेतकरी होते. पुढे राजकारणात प्रवेश करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नरच्या घराघरात पोहोचवला. सलग सहा वेळा वल्लभ बेनके यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. यापैकी चार वेळा ते निवडून आले. त्यांनी १९८५ ते २००९ या काळात आमदार म्हणून काम केले. कुशल संघटक, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाची जाण असणारा आणि प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू नेता, कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करणारा, मुत्सद्दी नेता अशी त्यांची ओळख झाली. वल्लभ बेनके यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. कृष्णा खोरे विकास महामंडळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्यकाळात कांदळी येथे औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. लेण्याद्री आणि ओझर देवस्थानच्या परिसराकरिता विकासनिधी उपलब्ध झाला. नारायणगाव येथे टोमॅटोचे खरेदी विक्री बाजार केंद्र सुरू झाले. प्रशासनावर पकड असणारा नेता म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. मात्र मागील काही वर्षांपासून आजारी असल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते.


सम्बन्धित सामग्री