Tuesday, July 02, 2024 08:03:45 AM

एसटी होणार पर्यावरणस्नेही

एसटी होणार पर्यावरणस्नेही

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४,प्रतिनिधी : वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच राज्य परिवहन महामंडळाच्या ५ हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर होणार आहे. यासाठी किंग गॅस कंपनीसोबत मंगळवारी (६ फेब्रुवारी रोजी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यामुले वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे दहा टक्के घट होण्यास मदत होणार असून महामंडळाचला दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

https://youtu.be/2ubHK-tENO0

        

सम्बन्धित सामग्री