Thursday, July 04, 2024 09:59:08 AM

जुन्नर तालुक्यात ‘बिबट सफारी’ प्रकल्पाला मंजुरी

जुन्नर तालुक्यात ‘बिबट सफारी’ प्रकल्पाला मंजुरी

पुणे, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये आंबेगव्हाण येथे ‘बिबट सफारी’ची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली.

जुन्नरमध्ये ५८ हजार ५८५ हेक्टर वनक्षेत्र असून, या भागात बिबट्यांची संख्या लक्षात घेऊन, नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी यासंदर्भात मागणी केली होती. यासाठी विस्तृत प्रकल्प आराखड्यास नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून मान्यता घेण्यात येईल. या प्रकल्प अहवाल खर्चासाठी ८० कोटी ४३ लाखांच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली. या सफारीमध्ये पर्यटक आणि बिबटे यांच्या सुरक्षिततेसाठी दुहेरी प्रवेशद्वार, सफारीतील रस्ते, गुहा, संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार संकुल यासारख्या सुविधा राहतील. तसेच जुन्नर हा राज्यातील पहिला पर्यटन तालुका होणार असल्याने पर्यटन सर्कीट विकसित करणे शक्य होईल.


सम्बन्धित सामग्री