Monday, July 08, 2024 01:57:33 AM

पुण्यात लवकरच भुयारातून मेट्रो धावणार

पुण्यात लवकरच भुयारातून मेट्रो धावणार

पुणे, ०६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पुणे शहराच्या इतिहासात प्रथमच भुयारी मेट्रो नदीपात्राखालून धावणार आहे. पुणे मेट्रोतील जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक हा मार्ग मुठा नदीपात्राच्या खालून काढण्यात आला आहे. ही मेट्रो सुरु करण्यापूर्वी सराव चाचणी घेण्यात आली. सोमवारी जिल्हा न्यायालय स्थानकातून सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी मेट्रो निघाली. त्यानंतर बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक हा टप्पा पार केला. मेट्रो ११ वाजून ५९ मिनिटांनी स्वारगेट स्थानकावर पोहोचली. चाचणीसाठी मेट्रोचा वेग ताशी ७.५ किलोमीटर ठेवला होता.

भुयारी मेट्रो अंतर

  • जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक अंतर ८५३ मीटर
  • बुधवार पेठ स्थानक ते मंडई स्थानक अंतर १ किलोमीटर
  • मंडई स्थानक ते स्वारगेट स्थानक अंतर १.४८ किलोमीटर
  • एकूण मेट्रो मार्ग ३.६४ किलोमीटर

महत्त्वाचे मुद्दे -

  • पुण्यात लवकरच भुयारातून मेट्रो धावणार
  • सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारातून मेट्रो चाचणी
  • मुळा मुठा नदीच्या भुयारातून धावणार पुणे मेट्रो

सम्बन्धित सामग्री