Monday, July 01, 2024 04:05:42 AM

पैठण शहराचा पाणीपुरवठा बंद

पैठण शहराचा पाणीपुरवठा बंद

छत्रपती संभाजीनगर, ०५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उशाला धरण असताना पैठण शहराला मागील दोन दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असून अनेकांना खासगी टँकर विकत घ्यावे लागत आहेत. नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ उपाययोजना राबविण्याची मागणी सर्वसामन्यांकडून होत आहे. पैठण शहराला पाणीपुरवठा करणारा पंप हाऊस जायकवाडी उत्तर येथे आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कधी पंप हाऊसवरील मोटार बंद होणे, कधी पंप हाऊसचा विद्युत पुरवठा खंडित होणे, कधी बिघाड होणे, तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती लागणे, कधी पाइपलाइन खराब होणे या समस्या सातत्याने उद्भवत आहेत. असाच, तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे दोन दिवसांपासून शहरात निर्जळी निर्माण झाली आहे.

महत्त्वाचे मुद्दे -

पैठण शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद
पाणीपुरवठा बंद असल्याने आंदोलनाचा इशारा


सम्बन्धित सामग्री