Thursday, July 04, 2024 08:47:39 AM

नाशकात आयकर विभागाचा छापा

नाशकात आयकर विभागाचा छापा

नाशिक, ०५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : नाशिकमधील काही शासकीय कंत्राटदारांच्या घरी व कार्यालयांवर आयकर विभागाच्या वतीने ३० जानेवारी पासून छापेमारी सुरू आहे. यात सुमारे करोडो रुपयांचे बेहिशेबी व्यवहाराची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारी व खासगी बँकांच्या लॉकर्समध्ये रोख रक्कम, कोटींचे दागिने, सोन्याची बिस्किटे सापडलेली आहेत. विशेष म्हणजे कंत्राटदारांनी व्यवहारांची कागदपत्रे कर्मचारी, नातलगांच्या घरी लपवल्याचेही उघड झाले आहे. तब्बल ८०० कोटीहून अधिक बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्याचे समजत आहे. आयकर विभागाच्या २०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही छापेमारी केल्याचं माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्त्वाचे मुद्दे -

  • नाशकात आयकर विभागाचा छापा
    शासकीय कंत्राटदारांच्या घर, कार्यालयांवर छापा
    कोट्यवधी बेहिशेबी मालमत्ता जप्त

सम्बन्धित सामग्री