Tuesday, July 02, 2024 09:22:52 AM

राज ठाकरे ४ दिवस नाशिक दौऱ्यावर

राज ठाकरे ४ दिवस नाशिक दौऱ्यावर

नाशिक, ०१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर आता ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे हेदेखील आज, गुरुवार (दि. १)पासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

नाशिक दौरा सुरू होण्यापूर्वीच ठाकरेंनी आपला चार दिवसांचा नियोजित दौरा दोन दिवसांवर आणला असून, या दोन दिवसांत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींची रणनीती आखली जाणार आहे. आता राज ठाकरेही नाशिकच्या राजकारणावर खल करणार असल्याने त्यांच्या या नाशिक दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपापाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार व सुप्रिया गट), शिवसेना आणि उद्धव गट यांनीही लोकसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ जानेवारी रोजी नाशिकचा दौरा करत भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही दि. २२ आणि २३ जानेवारी असे दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकत लोकसभेचा नारळ फोडला होता. त्यापाठोपाठ आता राज ठाकरेही नाशिकमध्ये दोन दिवस तळ ठोकणार आहेत. राज यांचा दौरा प्रारंभी दि. १ ते ४ फेब्रुवारी असा चार दिवसांचा होता. त्यात आता दोन दिवसांची कपात करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री