Saturday, July 06, 2024 11:34:57 PM

पुण्यात मराठ्यांचं सर्वेक्षण वेगात

पुण्यात मराठ्यांचं सर्वेक्षण वेगात

पुणे, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण सुरु आहे. मागील सहा दिवसात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात मिळून एकूण ९ लाख २ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

जिल्ह्यात या सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी २०२४ पासून सुरु करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत २ हजार प्रगणक आणि ग्रामीण भागात ६ हजार ५०० प्रगणकामार्फत हे सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षणासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली असून यामध्ये १८० प्रश्नांच्या आधारे हे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर जिहाधिकारी हे नोडल अधिकारी तर मनपा हद्दीत मनपा आयुक्त हे नोडल अधिकारी आहेत. तर तालुका स्तरावर तहसीलदार यांना नोडल अधिकारी म्हणून नेमले आहे.


सम्बन्धित सामग्री