Saturday, July 06, 2024 11:42:03 PM

संभाजीनगरात मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला वेग

संभाजीनगरात मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला वेग

संभाजीनगर, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या गतीला वेग आला असून मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी शासनाने पथक नेमले आहे. शहरात ५ दिवसांमध्ये तब्बल १ लाख ४ हजार ४१२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. काही भागांत सर्वेक्षणाला नागरिकांनी विरोध केला. पथकातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर सुरळीतपणे काम सुरू झाले आहे. याच दरम्यान, मोबाइलमधील अॅप वारंवार बंद पडत होते. मराठा समाजाच्या एखाद्या घराची संपूर्ण माहिती अॅपमध्ये नोंद करण्यासाठी किमान तास लागतो. महापालिकेतील उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी भागात सर्वेक्षण सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री