Saturday, April 26, 2025 12:28:34 AM

मनोज जरांगे यांचा निर्धार

मनोज जरांगे यांचा निर्धार

२८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ‘चलो मुंबई’ आंदोलन मागे घेत पुन्हा अंतरवाली सराटी गाठली आहे. सगे सोयऱ्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची सोमवारपर्यंत अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केली आहे. कुणबी नोंद असलेल्याच्या सगेसोयऱ्यांना शपथपत्र दाखल केल्यानंतर एक तरी प्रमाणपत्र मिळायला हवे, तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. राजपत्राचा कायदा पास झाला आणि त्याचा फायदाच झाला नाही तर काय उपयोग ? त्यामुळे एक टक्का लोकांना तरी प्रमाणपत्र त्या अध्यादेशामुळे मिळायला हवे असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच येत्या ३० जानेवारी रोजी रायगडला जाऊन आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेणार असून लवकरच मार्ग जाहीर करू असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.


सम्बन्धित सामग्री