Saturday, April 26, 2025 12:29:21 AM

मनोज जरांगे यांचीही कुणबी नोंद सापडली

मनोज जरांगे यांचीही कुणबी नोंद सापडली

बीड, ०७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची देखील आता कुणबी नोंद सापडली आहे. बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आली आहे. मोडी लिपी संशोधन करणारे पथक शिरूर दौऱ्यावर होतं, त्यादरम्यान त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील कुणबी असल्याचा पुरावा सापडला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यांचे वडील देखील आज शिरूर तहसील कार्यालयामध्ये हजर होते. नोंद मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री