Tuesday, July 02, 2024 08:33:22 AM

दादांचा इशारा, जरांगेंचा पलटवार

दादांचा इशारा जरांगेंचा पलटवार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातले वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलक धडकणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. या मागणीसाठी जरांगे पाटील मुंबईत आमरण उपोषण आणि आंदोलन करणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना कायदा हातात घेऊ नका, कोणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवण्यात येणार नाही, असा इशारा दिला आहे. या अजित पवारांच्या इशाऱ्यावर मनो जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

या इशा-याला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शेवटी त्यांनी आता पोटातले ओठात आणलेच, पहिल्यापासून तुम्ही मराठ्यांच्या विरोधातच काम केले आहे. दहा पाच जणांना जवळ करुन बाकी करोडो मराठ्यांचे वाटोळे केले, शांततेत येणाऱ्यांवर कारवाई करुन दाखवावी, मग मराठेही शांततेत उत्तर देतील, असे प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी दिले आहे. अजित पवार अपघाताने सत्तेत आलेला माणूस आहे. तो जर असे बोलत असेल, तर आम्ही त्याला सरकार मानत नाही. मुंबईला जाणार आणि ओबीसीतून आरक्षण मिळवणारच, तू कारवाई कर, केव्हा मराठे शांततेत उत्तर देतील, असे प्रतिआव्हान जरांगे पाटील यांनी दिले.


सम्बन्धित सामग्री