Thursday, July 04, 2024 09:17:21 AM

हवामान बदलाचा परिणाम आरोग्यावर

हवामान बदलाचा परिणाम आरोग्यावर

गोंदिया, ०७ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : गोंदिया जिल्ह्यात सध्या हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळणारे रुग्ण घरोघरी दिसू लागले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे रुग्ण दाखल होत आहेत. तरी लोकांनी याविषयी काळजी घ्यावी आणि गरम पाण्याचा, गरम कपडे यांचा वापर करावा, आवश्यक तो औषध उपचार करावा आणि गरज असल्यास थंडीमध्ये निघावे असे आवाहन शासकीय महाविद्यालयाचे डीन यांनी केले आहे. गोंदियात जरी अशा प्रकारचे रुग्ण वाढत असले, तरी मात्र सध्या कोविडच्या धोका जिल्ह्यामध्ये दिसून आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. महत्त्वाचे मुद्दे -

  • हवामान बदलाचा परिणाम आरोग्यावर
  • सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले


सम्बन्धित सामग्री