Monday, July 01, 2024 03:24:49 AM

बारामती अॅग्रोवर ईडीची कारवाई

बारामती अॅग्रोवर ईडीची कारवाई

बारामती, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या पुणे, पिंपरी, बारामती आणि छत्रपती संभाजीनगर येथील सहा कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) शुक्रवारी छापे टाकण्यात आले होते. यामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास पंधरा ते सोळा तास चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.. रात्री उशिरा ईडीचे अधिकारी बारामती येथील ऑफिसमधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. बारामती अॅग्रो कंपनीची पुणे, बारामतीसह पिंपरी आणि छत्रपती संभाजीनगरमध्येदेखील कार्यालये आहेत.

महत्त्वाचे मुद्दे -

  • बारामती अॅग्रोवर ईडीची कारवाई
  • कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे जप्त - सूत्र

सम्बन्धित सामग्री