Wednesday, July 03, 2024 01:32:18 PM

देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे

देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे

मुंबई, ०३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठक संपली आहे. हिट अँड रनचा कायदा लागू झालेला नाही आहे. ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. सरकारसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. हिट अँड रन कायद्यामुळे देशभरातील टँकर आणि ट्रक चालकांच्या संघटनांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. या संपामुळे संपूर्ण देशाला दिवसभरात फटका सहन करावा लागला. या संपामुळे मंगळवारी दिवसभर अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांबाहेर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही पेट्रोल पंपांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला. त्यामुळे नागरिकांवर प्रचंड मनस्तापाची वेळ आली. या संपामुळे भाजीपाला प्रचंड महागला. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक खूप अडचणीत सापडले होते. अखेर केंद्र सरकारचं आणि ट्रक चालकांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्याने देशातील सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा दिलासा मिळाला आहे.


सम्बन्धित सामग्री