Saturday, October 05, 2024 03:16:45 PM

बंदी असतानाही हिंगोलीत मांजाची विक्री

बंदी असतानाही हिंगोलीत मांजाची विक्री

हिंगोली, ०२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजा विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील सर्रासपणे मांजा विक्री केला जातो. अशा चायना बनावटीच्या मांजाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर हिंगोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

मकर संक्रांत आली की, पतंग उडविणे सुरु होत असते. परंतु हा पतंग उडविताना धोकेदायक चायना मांजा वापरला जात असतो. यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. राज्यभरात चायनीज मांजाने अनेकांचे बळी घेतले होते, या मांजामुळे पशुपक्षी आणि मानवाला गंभीर इजा होऊन जीव जात असल्याने गृह विभागाकडून कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा मांजा वापर आणि विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

त्यानंतर आता पोलीस ठिकठिकाणी पतंगाच्या दुकानावर चायनीज मांजा विक्री करताना कारवाई करत आहेत. अशाच प्रकारे हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने शहरातून दीड लाख रुपये किमतीचा चायनीज मांजा जप्त करत चायनीज मांजा विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी चायनीज मांजाची विक्री करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री