Sunday, July 07, 2024 01:32:21 AM

पुण्यात नववर्षानिमित्त मुख्य वाहतुकीत बदल

पुण्यात नववर्षानिमित्त मुख्य वाहतुकीत बदल

पुणे, ३१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नववर्षाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सोमवारी (१ जानेवारी) मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. शिवाजी रस्ता सर्व वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता डेक्कन जिमखाना खंडोजीबाबा चौकमार्गे टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जावे.

जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे चौक) महापालिका भवनकडे जाणारा मार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, महापालिका भवनमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे (हुतात्मा चौक) जाणारा मार्ग बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जावे. शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौकातून गणेश रस्त्यावरुन दारुवाला पूलकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळामार्गे, कुंभारवेस चौक, पवळे चौक, साततोटी चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्याने जिजामाता चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे -

पुण्यात नववर्षानिमित्त गर्दी होण्याची शक्यता
पुण्यातील मुख्य वाहतुकीत बदल
अनेक मार्गांवरील वाहतूक बंद राहणार


सम्बन्धित सामग्री