Sunday, July 07, 2024 08:35:33 PM

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला

नंदुरबार, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : तापी नदीच्या काठावर असलेल्या सारंगखेडा येथे घोडेबाजार आणि यात्रा सुरू असून नदीच्या काठावर असल्याने थंडीच्या तळाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे मानवी जनजीवनावर परिणाम झाला आहे तर त्याचप्रमाणे घोड्यावर जीवनावर दिसून येतो. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील घोडे बाजारात तीन हजारपेक्षा अधिक घोडे आहेत. वाढत्या थंडीत घोड्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. घोड्यांचे थंडी पासून रक्षण करण्यासाठी विशेष अशा उबदार कपड्यांची झुल त्याचा अंगावर टाकून शरीरातील तापमान कायम ठेवले जात आहे. त्याच सोबत डोळ्यांना खाण्यासाठी विशेष असं आहार दिला जात आहे. यात मका, बाजरी, गरम मसाले, गरम पाणी हे घोड्यांना खाण्यासाठी दिला जात आहे.


सम्बन्धित सामग्री