Sunday, July 07, 2024 08:36:42 PM

दोन परीक्षा एकाच दिवशी

दोन परीक्षा एकाच दिवशी

छत्रपती संभाजीनगर, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची विधी अभ्यासक्रमाची परीक्षा जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती परीक्षेच्या दरम्यान आली आहे. विधी अभ्यासक्रमाच्या अनेक विद्यार्थ्यांनी जलसंपदा विभागासाठी अर्ज केलेले आहेत. दोन्ही परीक्षा एकत्र आल्याने अशा विद्यार्थ्यांची संधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पेपरचे वेळापत्रक बदलण्यासाठी धाव घेतली तर काहींनी ईमेलद्वारे मागणी केली. विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. २१ नोव्हेंबरपासून पदवी तर १९ डिसेंबरपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमासह विधी, बीएड, शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झाल्या. आता या परीक्षांच्या वेळापत्रकावरुनी अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत सुरुवातीला पुनर्पपरीक्षार्थीसह इतर सत्रांची परीक्षा सुरू झाली. त्यात पुनर्पपरीक्षार्थीपैकी अनेक विद्यार्थ्यांचे एकाच वेळी दोन पेपर एकाचवेळी आल्याने गोंधळ उडाला होता. अनेकांना एकच पेपर द्यावा लागला. आता प्रथमसत्राच्या विद्यार्थ्यांसमोर ही नवीन अडचण निर्माण झाली आहे.

     

सम्बन्धित सामग्री