Wednesday, September 18, 2024 02:31:35 AM

काँग्रेस स्थापना दिनानिमित्त नागपुरात महारॅली

काँग्रेस स्थापना दिनानिमित्त नागपुरात महारॅली

नागपुर, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : काँग्रेसचा स्थापना दिवसांनिमित्त 'है तयार हम' महारॅली सभेच आयोजन उमरेड रोडवरील बहादुरा मैदानावर करण्यात आले आहे. महारॅली सभेतून लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचं रणशिंग फुंकत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी हे नेते या सभेत संबोधित करणार आहे. प्रियांका गांधी सुद्धा उपस्थित रहाणार असल्याचं बोललं जातं आहे. बिगुल फुंकण्यासाठी दीक्षाभूमी व संघभूमी असलेल्या उपराजधानीत गांधी कुटुंबीय प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहे.

या स्थापना दिवसानिमित्त काँग्रेसचे देशभरातील नेतेमंडळी हजेरी लावणार आहे. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते आमदार खासदार असणार आहे. यासाठी भव्य स्टेज उभारत तीन मंचावर नेते मंडळी तर एका मंचावर सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. या महारॅलीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. लाखोंच्या संख्यने काँग्रेस कार्यकर्ते सामील होतील असा दावा केला जात आहे.

दिल्ली ऐवजी ही सभा नागपुरात का?

काँग्रेसचा महाराष्ट्र आणि नागपूरशी ऐतिहासिक नातं आहे..
१८९१ साली काँग्रेसचे अधिवेशन नागपुरात पार पडले
१९२० साली काँग्रेसचा विशेष अधिवेशन नागपुरात पार पडलं होतं. त्या अधिवेशनामध्येच महात्मा गांधी यांना सर्वसामान्य नेता अशी ओळख मिळाली होती. याशिवाय स्वराज्य तसेच असहकार आंदोलन या प्रस्तावांवरही नागपूर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय झाले होते.
१९२० च्या त्याच अधिवेशनात काँग्रेसच्या घटनेत आवश्यक बदल करून काँग्रेसची आजची संघटनात्मक बांधणी निश्चित करण्यात आली होती.
स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसचा पहिला अधिवेशन १९५९मध्ये नागपूरतच पार पडला होता.या अधिवेशनात इंदिरा गांधी यांची काँग्रेस च्या अध्यक्षा म्हणून निवड झाली होती.
निवडणुकीच्या काळात ऊर्जा घेऊन जोरात मैदानात उतरण्यासाठीही काँग्रेसचा नागपूर आणि महाराष्ट्राची वेगळं नातं आहे. इंदिरा गांधी नेहमीच त्यांच्या लोकसभा प्रचाराचा बिगुल नंदुरबार मधून फुंकायच्या..
तर अडचणीच्या प्रसंगी (आणीबाणी नंतर) वैदर्भीय मतदाराने काँग्रेसला हाथ दिल्याचं अनेक वेळेला दिसून आल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा विदर्भावर खास प्रेम आहे.


सम्बन्धित सामग्री