Saturday, October 05, 2024 04:21:59 PM

'जे बोललो ते अंतिमच'

जे बोललो ते अंतिमच

पुणे, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिलंय. अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार अन् तो मोठ्या फरकाने निवडून आणणार, असं अजित पवार म्हणालेत.

त्यानंतर मंगळवारी सकाळी अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. अजित पवार मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी मंगळवारी हडपसर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे देखील अजित पवार यांच्यासोबत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

एका खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं. आता त्यांना आंदोलन सुचत आहेत. पण, त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते इतकंच नाही तर दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे बोलत होते. गेल्या पाच वर्षांत यांची भूमिका काय होती आणि गेल्या काळात तुम्ही कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघात पाहिलं, असा टोला अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना सोमवारी लगावला.


सम्बन्धित सामग्री